अहमदनगर बातम्या

सरकारचे फक्त एका आर्यन खानवर लक्ष: सर्वसामान्य,एसटी कर्मचाऱ्यांचे काही देणेघेणे नाही!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  उत्तर प्रदेशात घटना घडल्यानंतर महाराष्ट्र बंद करणारे महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली तरी या विषयावर बोलण्यासही तयार नाही.

फक्त एका आर्यन खान वर सरकार बोलत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा मी जाहीर निषेध करते.

अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपवर असुन पाथर्डी आगारातील कर्मचाऱ्यांचे नवीन बसस्थानक परिसरात उपेाषण सुरू आहे.

आमदार राजळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मागण्या समजुन घेतल्या व भाजपाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दिला.त्यावेळी त्या बोलत होत्या.

आ.राजळे पुढे म्हणाल्या की, मुंबईत रेल्वे प्रमाने ग्रामीण भागात एसटी बस जीवनदायी आहे.यात्रा, निवडणुक,कोरोना,शाळा या उपक्रमासाठी एसटी.ची अत्यंत गरज असते.मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन दिले जाते.त्यावर कुटुंब चालविणे अवघड आहे.

राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत तुमच्या मागण्या रास्त आहेत. मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.

कर्मचाऱ्यांनी संप सुरू करताच सरकारने तातडीने सरकारमधील सहभागी असलेल्या पक्षाशी संलग्न असणाऱ्या संघटनांना हाताशी धरून संप मिटल्याचे जाहीर केले.

मात्र त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही.जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत भाजपा तुमच्या पाठीशी असुन सरकारकडे पाठपुरावा करून सरकारमध्ये विलीनीकरणासाठी प्रयत्न करून न्याय मिळवुन दिला जाईल असेही आ.राजळे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office