दाणादाण! ‘ह्या’ गावात मध्यरात्रीपर्यंत 162 मिलिमीटर पाऊस, अंधाराचे साम्राज्य, वसाहतींमध्ये पाणी आणि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-सध्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. नेवासे तालुक्यातील सोनईमध्ये पावसाने चांगलीच दाणादिन उडवली.

गुरुवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत 162 मिलिमीटर (साडे सहा इंच) मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळला. या पावसाने सोनईच्या कौतुकी नदीला आलेल्या पुराचे पाणी गाव, पेठ व जवळच्या उपनगरातील वसाहतीमध्ये शिरले.

रात्री दहा वाजता सोनईच्या अण्णाभाऊ साठेनगर मधील 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. वरून मुसळधार पाऊस व खंडित वीजपुरवठ्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते.

ध्वनिक्षेपक जीप फिरवून पाणी गावात घुसत असून कुणीही घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले. या कोसळलेल्या पावसाने सर्वत्र जलमय वातावरण पहायला मिळत होते.

 येथे साचले पाणी :- सोनई जवळचे शांताराम कॉलनी, बँक कॉलनी, शिक्षक कॉलनी, चपळे मळा, सिध्दीविनायक कॉलनी, धनगरगल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, एकलव्य नगर या भागातील राहत्या घरांमध्ये पाणी घुसलेले असून

व्यापारीपेठ व बाजारतळ व्यावसायिक भागात, सोनई-राहुरी रस्ता, सोनई-घोडेगाव रस्ता, नवीपेठ, शिवाजी महाराज रोड, अहिल्यादेवी चौक,

विवेकानंद चौक, बसस्थानक परिसर, कौतुकी नदीपात्र व्यावसायिक क्षेत्र आदी भागात पाणी शिरल्याने सर्वत्र पाणीच पाणी वाहत आहे.

तर काही सखल ठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे. शनिशिंगणापूर मंदिर परीसर पाण्यातच होता. तर सोनई जवळचे खरवंडी, घोडेगाव, खेडले, लांडेवाडी, गणेशवाडी रस्ते शुक्रवार दुपारपर्यंत वाहतुकीस बंद पडलेले होते.

 शेतीचे नुकसान :- सोनई परीसरात शिंगणापूर, मुळा कारखाना, हनुमानवाडी, धनगरवाडी, बेल्हेकरवाडी इत्यादी भागातील शेतामध्ये असलेल्या तूर, सोयाबीन, बाजरी, घास, पावसाळी भुईमूग,

कपाशी पीकाचे मोठे नुकसान झाले तर ऊसपिक सततचे पावसामुळे काही ठिकाणी आडवे पडले. नवीन लागवडी व कांदा रोपांमध्ये पाणी साचले. गणेशवाडीतील नदीकाठच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व काही ऊस मुळासकट वाहून गेला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24