अहमदनगर बातम्या

नागरिकांनीच पकडून दिले काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे रोजगार कमी आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारकडून रेशन कार्डवर धान्य दिले जाते. मात्र अनेकजण त्याचा काळा बाजार करतात.

नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेले रेशनचे धान्य नागरिकांनीच पकडुन दिल्याची घटना घडली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील रेशन दुकानातदाराने काळ्या बाजारात खाजगी वाहनाने विक्रीला चालविलेले धान्य ग्रामस्थांनी पकडत रेशन दुकानदाराला जाब विचारत असताना

वाहन चालकाने गाडी त्या ठिकाणाहून पळून नेली. या प्रकरणी घुगल वडगाव येथील ग्रामस्थांनी श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office