अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- राज्यात सुरु असलेल्या ग्रामपंच्यात निवडणुकीचा शेवट काल मतमोजणीनंतर झाला, तरी अद्याप सरपंचपदाची सोडत जाहीर झालेली नाही. यामुळे अद्यापही उत्सुकता कायम आहे.
दरम्यान यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर काहींना आपली सत्ता राखण्यात यश आले आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निडवणुकीत सत्तापलटी झाली आहे.
शेवगाव तालुक्याच्या ४८ ग्रामपंचायत निकालात राष्ट्रवादी गटाला २०, स्थानिक आघाडी १७, भाजपा १० व शिवसेनेच्या ताब्यात १ ग्रामपंचायत आली असून काही विद्यमान सरपंचाला पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्या पिंगेवाडी, तर तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांच्या मजले शहर या गावांत राष्ट्रवादीने झेंडा फडकला.
आखतवाडे येथे विद्यमान सरपंच तथा भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी वर्षा सोनवणे, वाडगावचे विद्यमान सरपंच सुनिता जवरे, भातकुडगावचे सरपंच राजेश फटागंरे, ठाकूर निमगावचे सरपंच गहिनीनाथ कातकडे यांचा दारूण पराभव झाला.
चापडगाव व दहिफळ येथे दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे शहादेव पातकळ व सविता शिंदे यांना नशिबाने साथ मिळाली. भाविनिमगाव, बक्तरपूर, पिंगेवाडी, कोनोशी, आंतरवाली येथे राष्ट्रवादीच्या संपूर्ण जागा निवडून आल्या, तर भाजपला कोळगाव व ढोरजळगाव या दोनच गावांत पूर्ण बहुमत मिळाले.
ढोरजळगाव येथील भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश कराड व अन्ांता उकिर्डे यांच्या नेतृत्वाखाली आठ महिला निवडून आल्याने सत्तेची दोरी महिलांच्या हाती आली आहे. शिंगोरी येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले.
हसनापूर, सोनविहीर, बोडखे, ताजनापूर, कांबी, वाडगाव, नागलवाडी, जुने दहिफळ, राणेगाव, तळणी, दहिगाव शे., आव्हाणे खु, बेलगाव, चापडगाव, घोटण, मळेगाव, नजीक बाभूळगाव, राक्षी या ठिकाणी स्थानिक विकास आघाडीने विजय संपादन केला.