अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोज़णी प्रक्रिया सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात सुरू होणार असून, निकालानंतर विज़यी उमेदवारांनी मिरवणूक काढू नये, अशा सूचना पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिल्या आहेत.
आज़ सोमवारी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोज़णी होणार आहे. सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चा अंमल चालू आहे.
पोलिस स्टेशन हद्दीतील सर्वग्रामपंचायतींचा निकाल ज़ाहीर झाल्यानंतर विज़यी उमेदवार, पॅनलप्रमुख व त्यांच्या समर्थकांनी विज़यी मिरवणूक काढू नये, तसेच फटाके फोडू नये, गुलाल उधळू नये,
साऊंड सिस्टिम व बँड लावून मिरवणूक काढण्यास मनाई आहे. कायद्याचा कोणी भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिला आहे.