अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-निवडणूक दरम्यानचे वाद, कटुता आदी गोष्टींना आळा बसावा यासाठी कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी निवडणूका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी केले आहे.
गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत असते. प्रत्येक पक्षाचे नेते सत्ता हस्तगत करण्यासाठी धडपड करत असतात.
सध्याच्या परिस्थितीत निवडणुका पार पाडताना कार्यकर्त्यांमध्ये तसेच सामान्य नागरिकांमध्ये कटुता निर्माण होते. निवडणूक काळात टोकाचा संघर्ष होताना दिसतो.
हा संघर्ष टाळण्यासाठी गावातील सर्व पक्षांचे नेते, ज्येष्ठ लोक, युवक व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून या निवडणुका बिनविरोध कराव्यात. यामध्ये तरुणाईला प्राधान्य देण्यात यावे.
निवडणुका बिनविरोध केल्यास शासनस्तरावरून मोठा निधी आणण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती सभापती अश्विनी कानगुडे यांनी दिली.