अहमदनगर बातम्या

दरीत उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका ५० वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

या व्यक्तीच्या ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. सौताड्यात एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काही पर्यटकांनी या व्यक्तीस उडी मारताना पहिल्याने त्यांनी त्यांनी व ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील,

एपीआय धरणीधर कोळेकर , कर्मचारी अशोक तांबे, सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. धबधब्याजवळ बॅग सापडली. यात ओळखपत्र सापडले यावरून या व्यक्तीचे नाव झुंबर मुरलीधर गवांदे आहे.

ते श्रीगोंदे पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती समोर आली. उंचीवरून उडी मारल्याने मृतदेह सापडण्यास अडचणी आल्या. या मृतदेहाचा शोध शनिवारी घेण्यात येणार आहे. पोलिसांनी मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.

Ahmednagarlive24 Office