प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्रामसेवकांनी घेतली महसूल मंत्र्यांची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सर्व प्रधान सचिव यांची एकत्रित बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर होणेबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

त्यास प्रतिसाद देत नजीकच्या काळात लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे मान्य करून ग्रामसेवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पावसे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर राऊत,

ग्रामसेवक संघटनेचे राज्य कौन्सिलर सुरेश मंडलिक, ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक विशाल काळे, तालुका समन्वयक राहुल वाळके, संगणक परिचालक आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24