तालुक्याचे आजी – माजी आमदार बारावी फेल आहे; माजी उपनगरध्यक्षांची आमदारांवर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-तरूणांना राजकारण समजलं पाहिजे. गाव समजलं पाहिजे. गावाला नाव ठेवणारा माणूस आपल्या गावात नाही आला पाहिजे. आपले तरूण असतील, आपल्यात राजकारण असेेल,

 

आपल्यात संघर्ष असेल. तरूणांनो, तुम्ही कोणालीही निवडून द्या, तो कोणत्याही पक्षाचा, गटाचा, तटाचा असू द्या. कर्तबगार, सुशिक्षित उमेदवार निवडून द्या. तरच तुमच्या घराचा, गावाचा तसेच संपूर्ण परिसराचा विकास होईल.

नुसतं यायचं, भाषण करायचं आणि जायचं याला काही अर्थ नाही पारनेर हा सुशिक्षित तालुका आहे. बाबा हो, इथं कळतंय लोकांना. जनता आता पूर्वीसारखी आडाणी राहिली का ? तुम्ही दोघेही ‘आजी माजी’ बारावी नापास आहात. किती दिवस लोकांना वेडयात काढणार ? असा सवाल करीत चेडे यांनी लंके यांच्यासह माजी आ. विजय औटी यांनाही टोला लगावला.

तुम्ही तुमच्या हंग्यासाठी एखादा फिल्टर प्लॅन्ट उभारलाय का ? प्रत्येक वेळी सांगता मी पारनेरचा पाणी प्रश्‍न सोडविणार. का आमच्या गावाची बदनामी करता ? आमच्यासारख्या तरूणांना त्यावेळी राग येतो. चुकीच्या गोष्टी का सांगितल्या जातात ? आम्ही इथे इतके शिकलेले तरूण असताना या गावात जी नाही ती गोष्ट व्यवस्थीत केली आहे.

तुम्ही बदनामी का करता ? मीत्रांनो यासाठीच राजकारण कळाले पाहिजे असे सांगत पारनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर जोेरदार टिकाश्र सोडत नगरपंचायत निवडणूकीचे रणशिंग फुंकले. प्रभाग क्रमांक दहामधील ३२ लाख रूपये खर्चाच्या तिन रस्त्यांचे चेडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले,

त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चेडे यांनी आमदार लंके यांना लक्ष्य करीत जोरदार टिकाश्र सोडले. काही दिवसांपूर्वी आमदार लंके यांनी तालुक्यात विविध ठिकाणी भूमीपूजने केली. त्यासाठी केंद्र सारकरचाच निधी उपलब्ध झाला होता. मोदी सरकारने निर्णय घेतल्यामुळेच थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर निधी वर्ग होत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत चेडे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24