अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.यात चक्क नातवानेच आजीचे २ लाख ३२ हजारांचे दागिने लंपास केले.
ही घटना शहरातील नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील भावनाऋषी सोसायटीत घडली. याबाबत सविस्तर असे की, नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील भावनाऋषी सोसायटीत श्रीमती पुष्पा सुरेशराव देशमुख वय ३५ या त्यांचा नातू शिरीष संजय देशमुख याच्यासह राहतात.
दि.१३ रोजी घराचा दरवाजा उघडा असताना शिरीश संजय देशमुख,भोल्या पूर्ण नाव माहित नाही.कमलेश येवले या तिघंानी घरात घुसून फिर्यादी पुष्पा देशमुख यांनी पत्र्याच्या पेटीत ठेवलेले २ लाख ३२ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान या दागिन्यांबाबत शिरीष देशमुख याच्याकडे चौकशी केली असता.
त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वरील तिघांविरूध्द श्रीमती पुष्पा सुरेशराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पुढील तपास पोहेकॉग़ाजरे हे करत आहेत.