अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष जितेंद्र साठे, बाळासाहेब मधे, बौध्दाचार्य दिपक पाटोळे, संतोष जाधव, प्रतिक जाधव,
अजिनाथ आलचेट्टी, अतुल काते, विजू गायकवाड, सागर पोळ, रामभाऊ ठुबे, बाळासाहेब गायकवाड, सचिन खुडे, रमेश बागल, सुधीर सुर्यवंशी, दामोदर साळवे आदि उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळ्याने शहराची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. अनेकवर्षापासून मार्केटयार्ड चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याने त्यांच्या अनुयायीमध्ये एक वेगळी भावना जोडली गेली आहे.
शहरात इतर ठिकाणी पुतळा उभारत असताना मार्केटयार्ड चौकातील पुतळा न हटविता त्या ठिकाणी देखील पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा प्रभारी संजय डहाणे व जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved