अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अकोलेचे गटविकास अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले.
भास्कर रेंगडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून एका ठेकेदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. धाड पडल्याचे लक्षात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्याचे समजते.
नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील पंचायत समिती कार्यालयात काल दुपारी छापा टाकला.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ठेकेदार असुन त्यानी तालुक्यातील म्हाळुंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.
या कामाचे बील रक्कम तिन लाख रूपयांचा चेक काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांनी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com