पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौर्‍यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, (दि.03 डिसेंबर) रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहे.

दरम्यान पालकमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. गुरुवार 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास साईबाबा दर्शन घेऊन . सकाळी 9-45 वाजेपर्यंत साईबाबा मंदीर येथून अहमदनगरकडे निघणार आहे.

नगरमध्ये आल्यानंतर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे येणार आहे. सकाळी 11 वाजता कोरोनामुळे मयत झालेल्या ग्रामसेवक कुटूंबियांना विमा कवच अंतर्गत मदत रु. 50 लाख रकमेचा धनादेश वाटप करण्यात येणार आहे. कोरोना सद्यस्थिती व कोरोना दुसरी लाट बाबत आढावा बैठक होणार आहे.

तसेच दुपारी 12 वाजता अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना देण्यात येणा-या शासकीय मदतीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2.30 वाजता अहमदनगर येथून शिर्डी विमानतळाकडे जाणार असून दुपारी 3.45 वाजता खाजगी विमानाने शिर्डी विमानतळ येथून कोल्हापूरला रवाना होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24