कोरोना निधी बाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेला निधी व त्यातून झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर शहरात आले होते. ध्वजारोहणच्या कार्यक्रमानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी हि माहिती दिली आहे.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयांनी मोठे योगदान दिले आहे. त्यानंतर खासगी रुग्णालय त्यामध्ये आले.

पण या काळात पीएम केअर सेंटर, नॅशनल हेल्थ मिशन तसेच राज्य सरकारकडून निधी येथील प्रशासनाला प्राप्त झाला. त्यातून विविध वैद्यकीय सेवांसाठी खर्चही झाला आहे.

पण या निधीची व खर्चाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार याची चौकशी निश्चितपणे केली जाईल, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24