पालकमंत्र्यांना आली जाग… ‘ह्या’ दिवशी अहमदनगर दौऱ्यावर येणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रोज ८०० – ९०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगरमध्ये परिस्थिती नियंत्रीत आहे असे सांगत होते. परंतु सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे.

ही बाब लक्षात आणून देत मनसेचे परेश पुरोहित यांनी पालकमंत्री हरवले आहेत अशी टीका केली होती. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी नगरमध्ये येत असून मनसेमुळेच पालकमंत्री जागे झाले,

असा दावा परेश पुरोहित यांनी केला आहे. नगरच्या अमरधाम मध्ये एकाच वेळी २२ जणांचे मृतदेह अंत्यसंस्कार करण्यात येतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना सोयसुविधा नाहीत.

मध्यंतरी कोरोना चाचणी करण्यासाठी जे स्वॅब किट लागतात ते दोन दिवस उपलब्ध नव्हते. मनसेने मुख्यमंत्री यांना निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री हे नगर मध्ये आढावा घेण्यासाठी येत आहेत,

असे त्यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर दौऱ्यावर येणार त्यांना असून मनसेचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी घोषणा केली , हा मनसेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया पुरोहित यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24