महिला बचत गट कार्यशाळा व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर गावात ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या महिला शिक्षिकांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.

पंचायत समिती अहमदनगर अंतर्गत महिला बचत गट कार्यशाळा घेऊन, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सरपंच सुधाकर कदम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राज्य सरकारने सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय योगदानाची स्मृती ठेवत त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने राधिका वामन, मंदा कर्डिले, राजश्री कोल्हे आदी महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर गव्हाणे म्हणाले की, महिलांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिला बचत गटांचा मोठा आधार मिळाला.

बचत गटामुळे महिलांची प्रगती झाली असून, महिलांनी देखील अनेक व्यवसाय थाटून आर्थिक सक्षम झाले असल्याचे सांगितले. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिनेश निमसे यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, अनुदान विषयी माहिती दिली.

यावेळी आकाश महाराज फुले यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. कार्यक्रमास सरपंच सुधाकर कदम, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, शिवाजी होळकर, राजेंद्र होळकर, रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, प्रकाश कांडेकर, नानासाहेब बेल्हेकर, विलास चौरे, शिवाजी खामकर,

जिजाबापू होळकर, गणेश फुले, दिनेश राऊत, महेंद्र चौगुले, भानुदास फुले, राजू गवारे, गौरव होले, शाहू होले, अक्षय बेल्हेकर, ऋषिकेश मेहत्रे, गोरख फुले, सुरज साळुंखे, मिटू होळकर, भोलेनाथ नेमाणे, शुभांगी काकडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24