अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरातील झेंडा चौकात सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा कारवाई करत पकडण्यात आला. बुधवारी ३ जून रोजी रात्री १.३० वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर कारवाई केली. यात एकास अटक केली आहे.
त्यांच्याकडून हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखूचे असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णु मुळे यांनी फिर्याद दिली
असून त्यात म्हटले आहे की, मदन विजय कनगरे, (रा. नवीन घरकूल गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर) हा बुधवारी रात्री १.३० च्या दरम्यान अवैधरित्या गुटखा घेऊन जात होता. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ मुद्देमालासह अटक केली.
त्यांच्याकडून हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखूचे असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, राज्यात व प्रतिबंधित अन्न पदार्थाची उत्पादन, वाहतूक, वितरण, साठा व विक्री यावर बंदी असल्याची माहिती असून सुद्धा तालुक्यात व शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा व विक्री केली जात आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews