गुटख्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यात गुटखा तस्करी सुरूच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे.

संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.

राज्यात गुटखा विक्री व उत्पादन करण्यास प्रतिबंध असतांनाही संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होत आहे. संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा विक्रीविरुध्द मोहीम उघडली आहे.

महिन्याभरात पोलिसांनी पाच ते सहा कारवाया केल्या आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. हा गुटखा नेमका येतो कुठून? या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे.

याबाबत पोलीस मात्र तपास लावू शकले नाही. समजलेल्या माहितीनुसार संगमनेर व राहाता तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या एका मोठ्या गावामध्ये गुटख्याचा मोठा साठा असून

या साठ्यातून तालुक्यात ठिकठिकाणी गुटखा विक्री केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी छोटे मासे पकडले आता मोठा मासाही पकडावा अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24