संगमनेरात पुन्हा गुटखा पकडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे गुरुकृपा अँक्का चंदनापुरीच्या समोरील जागेत अन्न ओषध अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने काल ८.३० च्या सुमारास छापा टाकून २ लाख २२ हजार ६६० रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू पानमसाला साठा पकडला.

त्यात हिरा हिग पानपसाला रॉयल तंबाखू आहे. अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व ओषध प्रशासन नगरचे उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजय बाबुलाल लुंकड, वव ४७ रा. २ घुलेवाडी ता. संगमनेर याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात अन्न सुरक्षा व माणके कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी व्यापारी संजय लुंकड याला अटक करण्यात आली असून पोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ शेख हे पुढील तपास कीत आहेत, असे पोलीस सुत्रांनी सांगितले. या कारवाईने चोरुन गुटखा विकणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24