Ahmednagar News : सहा लाखांचा गुटखा पकडला,दोघा भावांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अकोले येथे सुमारे सहा लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अकोले पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण अटकेत तर एक जण पसार झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की सोमवारी सकाळी ६.१५ वाजता धामणगावपाट येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात आरोपी सागर रमेश नाईकवाडी व सनी रमेश नाईकवाडी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या टाटा सुमो गाडीमध्ये अवैध गुटखा मिळून आला.

पोलीस नाईक विठ्ठल शेरमाले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले, की महारष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू व पानमसाला अवैध रित्या विक्री करण्यासाठी स्वतःचे कब्जात बाळगताना आरोपी सागर रमेश नाईकवाडी व सनी रमेश नाईकवाडी आढळून आले.

त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या टाटा सुमो गाडीमध्ये हा गुटखा मिळाला. यामध्ये हिरा पान मसाला असे नाव असलेल्या आठ गोण्यांमध्ये ८०० पुडे मिळाले, तसेच रॉयल ७१७ असे नाव असलेल्या सुगंधित तंबाखूच्या ८ गोण्यांमध्ये ८०० पुडे, तसेच टाटा सुमो गाडी अकोले पोलिसांनी जप्त केली आहे.

आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सागर नाईकवाडी यास अटक केली आहे.