ज्ञानसंपदा स्कूल गुरु शनीच्या युतीचे साक्षिदार.विद्यार्थी,पालक ,शिक्षकानी घेतला आकाश दर्शनाचा आनंद .

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गुरु व शनी सूर्य मालेतील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे ग्रह आहेत.सध्या ते अत्यंत जवळ आले असून त्यांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग अनुभवास येत आहे.

हा आनंद विद्यार्थी,पालक व शिक्षकाना मिळावा यासाठी ज्ञानसंपदा स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी खास दुर्बिणीची व्यवस्था हि करण्यात आली होती. व्हर्सेटाईल ग्रुपच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमास श्री.अनिरुद्ध बोपर्डीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

संध्याकाळी गुरु व शनी युतीच्या दर्शनाने पालक, विद्यार्थी भारावून गेले,हे दृश्य दुर्बिणी शिवाय डोळ्यांनी दिसत असल्याने एकाच वेळी सर्वांना अनुभव घेता आला. या पूर्वी अशी युती २००० साली पाहण्यास मिळाली होती तर भविष्यात २०८० साली पुन्हा असा योग अनुभवता येणार आहे.

या अभिनव उपक्रमा बद्दल विद्यार्थी,पालक , शिक्षक यांनी संस्था पदाधिकार्यांचे आभार मानले.या वेळी शाळेचे कार्यकारी अधिकारी श्री.विनीत साठे,मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर व मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24