आमदार अबू आजमी अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी आले असतेच तर भलतच घडल असत ! पण अहमदनगर पोलिसांनी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथे धार्मिक स्थळावरून सुरू असलेल्या वादाला वेगळे वळण मिळण्याच्या आतच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टाळला. गुहा येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांना संगमनेर येथे पोलिसांनी रोखून धरल्याने जमावाला शांत करण्यामध्ये यश आले. यावेळी गुहाचे ग्रामस्थ व विशेषतः युवक आक्रमक झाले होते.

गुहा येथे सुरू असलेल्या धार्मिक स्थळाच्या वादावरून तेथील पुजाऱ्यांना व इतरांना मारहाण झाली होती. या मारहाणीचा समस्त ग्रामस्थांनी निषेध केला होता. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हेही दाखल झाले होते.

त्यानंतर काल रविवार दिनांक १९ रोजी पुन्हा गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार अबू आजमी हे या गावातील लोकांची भेट घेण्यासाठी येणार, याचा कडाडून विरोध इतर संघटनांनी केला व गुहा गावच्या वेशीजवळ आंदोलन केले,

आमदार आजमींना कोणत्याही परिस्थितीमध्ये गावामध्ये येऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला; मात्र संगमनेर येथे आमदार आजमींच्या बरोबर पोलीस प्रशासनाच्या झालेल्या बैठकीनंतर त्यांना संगमनेर येथेच रोखण्यात आले. त्यामुळे मोठा वाद टळला.

यावेळी युवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली; मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ ठरला, हे वातावरण चिघळत राहिल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता टाळता येत नाही.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पोलीस गुहा येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी युवकांनी फलक दर्शवत आमदार अबू आजमी यांचा निषेध केला.

याबाबत पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले, की गुहा येथे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी येणार होते; परंतु गुहा गावात गुहा व्यतिरीक्त बाहेरील व्यक्तींनी येऊ नये, असे गावातील नागरिकांचे म्हणणे असल्याने आमदार आझमी यांना विरोध दर्शवण्यासाठी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता.

ही परिस्थिती विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने गुहा येथे आपण आल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडू शकते, हे संगमनेर येथे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यास आमदार आजमी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पोलीस प्रशासनाच्या विनंतीस आणि आवाहनाचा विचार करून गुहा येथे जाण्याचा निर्णय बदलला. संगमनेर येथे या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,

पोलीस ठाणे राहुरी, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे संगमनेर, पोलिस निरीक्षक शिरसाट हे फौज फाट्यासह हजर होते. त्यानंतर अबू आझमी हे त्यांच्या नियोजित औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झाले; परंतु सर्व परिस्थिती विचारात घेऊन पोलीस त्यांना औरंगाबादपर्यंत सोडण्यासाठी सोबत गेले.