अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात ठेवीदारांना लाखोंचा गंडा घालून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली. आरोपींना अटक करून ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी हे उपोषण करण्यात आले.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगितले.