येथे हातभट्टी दारूचा सुळसुळाट; सहा छापे, आठ व्यक्तींवर गुन्हे

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सहा गावात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकत हातभट्टी अड्डे उध्दवस्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये एक लाख 88 हजार रूपयांची दारू, कच्चे रसायन जप्त केले असून आठ हातभट्टी चालकांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मच्छिंद्र उर्फ रवी लहानू पवार (रा. साकत ता. नगर), रेहमान बाबु शेख (रा. खांडके ता. नगर), अनिल नानाभाऊ पवार (रा. वाळकी ता. नगर), गणेश गोरख चौगुले (रा. चौगुले वस्ती, नेप्ती ता. नगर), दिलीप नाथू पवार (रा. नेप्ती), विलास हिरामण पवार (रा. धोंडेवाडी ता. नगर), नाना हरी पवार (रा. साकत), अशोक हिरामण गव्हाणे (रा. सोनेवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या हातभट्टी चालकांची नावे आहेत.

Advertisement

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेप्ती, वाळकी, साकत, सोनेवाडी, धोंडेवाडी, खांडके या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.