अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- नगर शहरात बोल्हेगाव भागात सिना नदी पात्राच्या लगत रेणुका नावाच्या १८ वर्ष वयाच्या अविवाहित तरुणीने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
एक विवाहित तरुण व त्याची पत्नी यांनी तरुणीला त्रास दिल्याने त्यातून रेणुका हिने गळफास घेवुन १९ डिसेंबर रोजी पाचच्या सुमारास आत्महत्या करुन आपले जीवन संपविले.
या खळबळजनक प्रकरणी पिडीत गरीब तरुण मुलीची आई गीता रा. एकलव्य वस्ती, सावेडी नाका, नगर या महिलेने काल तोफखाना पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी राकेश अशोक बनकर, उज्वला राकेश बनकर,
दोघे र. बोल्हेगाव गावठाण, अ. नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मयत तरुणी रेणुका यांची आई गीता यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी राकेश अशोक बनकर याने त्याचे स्वत:चे लग्न झालेले असताना
देखील मुलगी रेणुका हिला माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे म्हणुन तिच्याशी लग्न न करता तिला आरोपी राकेश बनकर याने त्रास दिला.
त्याची पत्नी उज्वला राकेश बनकर या आरोपी तरुणीने मयत रेणुका हिला ‘चापटीने मारहाण करून शिवीगाळ करत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.
या दोघांच्या त्रासातून सिना नदीमध्ये लिंबाच्या झाडाला ओढणीने गळफास घेवून रेणुका या १८ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास सपोनि मुंढे हे करीत आहेत.