अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नगर शहर कापड बाजार परिसरात कापड खरेदी करण्यासाठी आलेली अल्पवयीन विद्यार्थिनी (रा. बुरूडगाव रोड) ही गेली असता भरदिवसा 3 च्या सुमारास आरोपी तानाजी राजे आंधळे याने त्याची दुचाकी विद्यार्थिनीला आडवी घालून माझे तुझ्यावर प्रेम आहे.
तू जर माझ्याशी बोलली नाहीतर मी तुझी बदनामी करील, तुला माझ्यासोबत रहावे लागेल, असे म्हणत धमकी दिली व हात दाखवून तुझे नाव माझ्या हातावर आहे बघ, तुझे फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करील,
अश्लिल भाषेत बोलून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तुझे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी दिली.पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने कोतवाली पोलिसात फिर्याद दिल्यावरून
आरोपी तानाजीराजे आंधळे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डिवायएसपी पाटील, पोनि मानगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपीचा सपोनि भंगाळे हे शोध घेत आहेत.