Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी बु. ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्या धामोरी बुद्रुक येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात.
त्यांचा विवाह विजय रखमा आव्हाड (रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर) यांच्या सोबत दि. १८ एप्रिल २०१८ रोजी झाला होता. धामोरी येथे अंगणवाडी सेविका असल्याने जयश्री यांना उंदीरगाव ते धामोरी दरम्यान रोज ये-जा करावी लागत असे. लग्न झाल्यानंतर सुमारे तीन महीने सासरच्या लोकांनी जयश्री यांना चांगल्या प्रकारे नांदविले.
त्यानंतर तु धामोरी येथे जायचे नाही, तु तेथील काम सोडुन दे. तु जादू टोना करतेस माहेरी जावु नको. असे म्हणून तीला शिवीगाळ करुन किरकोळ कारणावरुन मारहान करु लागले. त्यानंतर शेतात कुक्कुटपालन करायचे आहे, त्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी सासरचे लोक जयश्री हिला लाथा बुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ करायचे.
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जयश्री विजय आव्हाड या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती विजय रखमा आव्हाड, सासु हिराबाई रखमा आव्हाड, सासरा रखमा बन्सी अव्हाड, नंनद सुनिता रखमा आव्हाड (सर्व रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर) तसेच नंनद संगीता अनिल सोळसे,
नंदई अनिल साहेबराव सोळसे (रा. दहेगाव, ता. राहाता), नंनद अनिता चंद्रकांत वाकचौरे, नंदई चंद्रकांत भाऊ वाकचौरे (दोघे रा. मुलनमाथा, राहुरी) या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. २९१/२०२४ नुसार भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे शारीरीक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.