Ahmednagar News : गावोगावची तलावे, बंधारे, धरणे पूर्णक्षमतेने भरलेली नाहीत. त्यातच आता पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावला आहे. पाऊस गेल की काय? असा चिंताजनक प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र, नवरात्रोत्सवात पुन्हा मेघराज बरसेल असा अपेक्षा शेतकरी बाळगून आहे
पावसाअभावी खरीपाची पिके शेतकयांच्या पदरात पडली नाही. गणेशोत्सवात झालेल्या पावसामुळे फळबागांना जीवदान मिळून रब्बीच्या पिकांची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सध्या पाणी टंचाई दूर झाली असली तरी गावोगावच्या तलावांमध्ये १०० टक्के पाणी साठा नाही. अपवाद गळता अजूनही बहुतांश नद्यांना पुराचे पाणी चाहिले नाही. त्यामुळेच अजूनही खूप मोठ्या पावसाची गरज आहे. आहे. तो पाणी साठा फार फार दोन अथवा तीन महिने पुरवू शकतो. तेथून पुढे काय? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
जिल्हाधिकान्यांच्या मान्यतेने पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर होतात आणि टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य टंचाई परिस्थिती लक्षात कृती आराखडा तयार करण्यात येतो.
यावर्षी जिल्ह्यात १५ एप्रिल रोजी पिण्याचे पाणी पुरविणारा पहिला टैंकर सुरू झाला. नंतर सप्टेंबर महिन्यात ही टैकरची संख्या वाढत गेली. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूगर्भ जलस्तर दिलासादायक राहिला.
त्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात पावसाने हात आखडता घेवूनही सुरुवातीला टंचाईचा ताण फारसा जाणवला नाही. मात्र, ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील अनेक मंडळात सलग दोन-तीन आठवडे पावसाने पाठ फिरवली.
त्यामुळे दुष्काळाचे आणि पाठोपाठ टंचाईचे संकट गडद झाले. अपुऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील चळवली. २२ सप्टेंबर पर्यंत प्रशासनामार्फत पिण्याचे पाणी पुरवला करण्यासाठी धावणाऱ्या टँकरची संख्या तब्बल ९४ झाली होती.
दरम्यान गण-गौरीचा उत्सव साजरा होत असताना रुसलेला पाऊस पुन्हा कृपावंत होऊन जिल्ह्याच्या शिवारात बरसला. त्यामुळे टंचाईचे गळभे तुर्त हटले. दि.३० सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील ४८ गावे आणि २८८ वाड्यावरील एक लाख सहा हजार २७६ नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ५४ टैंकर धावत होते. एक ऑक्टोबर पासून जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेतील अहवालात टेकरची संख्या शून्य झाली आहे.