नादुरुस्त रस्त्याचा निषेध म्हणून प्रहार संघटनेने केले हटके स्टाईल आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात एकही रस्ता साधा व्यवस्थित राहिलेला नाही आहे. नागरिकांनी कितीही आंदोलने केली तरी आश्वासनांचे गाजर देणारे लोकप्रतिनिधी काम करत नसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे त्रस्त झालेली जनता रस्त्यावर उतरू लागली आहे. यातच शेवगाव तालुक्यातील दहिगावने मध्ये प्रहार संघटनेने जरा हटके स्टाईल आंदोलन केले आहे. शेवगाव-नेवासे मार्गावर शेवगाव शहरापासून खामगाव फाटा या दहा किमी अंतरावरील रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांना संकटाचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी अपघटनाचे सत्र सुरूच आहे. वारंवार कल्पना देऊनही रस्यावरील खडडे बुजविण्याची तसदी बांधकाम विभागाने घेतली नाही.

सध्या साखर गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यावव रोजच अपघात घडत असतात. रस्त्याची खड्ड्यामुळे झालेली दुरावस्था पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे खडे बुजवणे अपेक्षित होते. या रस्त्यावरून चालताना ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते.

यातच “आपणा काम बनता भाड मे जाये जनता असे” असे लोकप्रतिनिधीं तालुक्यांना मिळाले असल्याने जनतेच्या समस्या या वाढतच जाणार. याच महत्वाच्या नागरी समस्येसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गांधीगिरी करून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24