अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाला लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्या.
या आढावा बैठकीत खासदार लोखंडे यांनी प्रथमतः प्रत्येक तालुक्यातील लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची प्राप्त परिस्थिती जाणून घेतली.
याप्रसंगी सदाशिव लोखंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत उत्तर नगर जिल्ह्यास साई बाबा संस्थानने जे सामाजिक दायित्व दाखवले, हे खूपच प्रशंसनीय आहे.
तिसऱ्या लाटेत देखील साई संस्थानने अशाच प्रकारचे सहकार्य दाखवावे. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य प्रशासनाने त्वरित कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाटा, आयसीयू, ऑक्सिजन, आणि औषधे उपलब्ध करून देण्यात यावी.
यासाठी शासन आपणास सर्वोत्तोपरी सहकार्य करेल. लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. दुसरा टप्पाही यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्ह्या परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गामपंचायतीचे सरपंच आणि गावागावातील सामाजिक संस्था,
दानशूर व्यक्तिंना सोबत घेऊन लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन सदाशिव लोखंडे यांनी केले. संस्थानच्या या योगदानाबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांचा सत्कार खासदार लोखंडे यांनी केला.
या बैठकीस साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, जिल्हा शल्यचिकित्सक भाऊसाहेब रामटेके, कमलाकर कोते, विजयराव जगताप, संजय शिंदे, सचिन कोते,अमोल गायके,
आदीसह शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्याधिकारी प्रमोद म्हस्के, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, डॉ. प्रीतम वडगावे तसेच अकोला, संगमनेर, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यातील तहसीलदार व आरोग्याधिकारी उपस्थित होते.