तो नेहमीच धुमाकूळ घालायचा आता पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  युवकाच्या डोक्यात टणक वस्तू मारून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केला. त्याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

किरण कराळे (रा. कापुरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी कराळे हा कापुरवाडी परिसरात धुमाकूळ घालत होता. त्याने 5 जानेवारी 2022 रोजी रात्री नऊ वाजता कापुरवाडी शिवारात आदित्य मुठे याच्यासोबत भांडण केले.

Advertisement

याची माहिती आदित्याचा भाऊ मयूर सुखदेव मुठे (वय 22 रा. कापुरवाडी) यांना कळली. मयूर हा त्याच्या दुचाकीवरून रस्त्याने जात असताना रस्त्यावर किरण याने त्याला अडविले.

मयूरच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर किरण पसार झाला होता.

याप्रकरणी मयूर याने भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने आरोपी किरणला जेरबंद केले आहे.