अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात फसवणूक, अवैध पदार्थांची विक्री , दुचाकी चोरी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
श्रीरामपुरातील एका तरुणाने कर्नाटकात जाऊन पोलीस असल्याचे भासवून सोने लुटले आहे. कर्नाटक पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने एका सराफास ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी: दोन वर्षापूर्वी म्हणजे 2018-2019 या काळात जाकीर हुसेन युसूफ खान (वय 26) रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर याने व त्याच्या काही साथीदारांनी रस्त्याने जाणार्या लोकांना अडवून आम्ही सीबीआय ऑफीसर आहोत
असे सांगून लोकांकडे असलेले सोने लुटमार करत होते. काही ठिकाणी पोलीस असल्याचे सांगत काही तरी गंभीर घटना घडत असल्याचे सांगून त्यांच्याकडे असलेले
सोने काढून रुमालात बांधून हे आरोपी पसार झाले. याप्रकरणी कर्नाटकातील उडपी पोलीस ठाणे याठिकाणी जबरी चोरीचे 392 व 420 फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved