अहमदनगर बातम्या

भर दिवसा घरात घुसून तलवारीने तुफान हाणामारी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथील पिंपळे वस्ती याठिकाणी, तलवारी, कुऱ्हाडी,लाकडी दांडे, व गजा काठ्यांनी तुफान हाणामारीची घटना घडली आहे.

पिंपळे यांच्या येथे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतांना औरंगाबाद येथून आलेल्या एम एच २० डी व्ही ७३३० व एम एच १२ एच व्ही ९२४२ गाडीतून आलेल्या, अंदाजे २४ ते २५ जणांनी, जेवणास बसलेल्या महिला,पुरुषांसह लहान मुला मुलींवर जीवघेणा सशस्त्र हल्ला केले.

एवढेच नाही तर जीवे मारण्याच्या उद्देशाने आलेल्या माणसांनी महिलांच्या अंगावर हात टाकून,त्यांच्या अंगावरील कपडे फाडून, त्यांच्याशी असभ्य वर्तन केले.

सदरच्या हल्ल्यात राजू गंगाधर चव्हाण व अनिल बबन पिंपळे हे दोघे गंभीर जखमी झालेत सध्या त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सशस्त्र हल्ल्या का झाला या संदर्भात माहिती घेतली असता.

२० डिसेंबर २०२१ रोजी मध्य रात्री ३ वाजेच्या सुमारास देविदास पिंपळे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात, रुपचंद चव्हाण यास संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून तुमच्यामुळेच आमचा माणूस आतमध्ये आहे.

तुम्ही आमच्या माणसाला सोडवा, नाहीतर तुमच्या घरातील लोकांचे तुकडे तुकडे करून टाकू, अशी धमकी १८ जानेवारीच्या दुपारी सुरेश शंकर पिंपळे राहणार औरंगाबाद यांनी दिली होती.

यासंदर्भात लखन बबन पिंपळे यांनी अशोकनगर पोलीस निवारा कक्षात लेखी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी सदर अर्जाचे गांभीर्य घेतले नाही. आणि औरंगाबाद येथून आलेल्या.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी सशस्त्र हल्ला केला. ज्यात एम एच १२ एच व्ही ९२४२ या गाडीतुन आलेले लोक पसार होण्यास यशस्वी झाले.

तर एम एच २० डी व्ही ७३३० गाडीतील १० ते १२ लोकांना,स्थानिक ग्रामस्थांनी गाडीसह पोलिसांना पकडून दिले असून सदरचा सशस्त्र हल्ला करणाऱ्या आरोपी विरुद्ध, सशस्त्र दरोडा,प्राणघातक हल्ला, तसेच महिलांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पिंपळे कुटुंबीयांनी केली असून.

भविष्यात सदरच्या लोकांकडून कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची भीती देखील, पीडितांनी केली आहे. वडाळामहादेव येथील सशस्त्र मारहाण प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office