अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- शेतात चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या मेंढ्यांच्या काळपावर उसात दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून एका मेंढीला ऊसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला.
ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा या गावात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय थोरात हे आपल्या मेंढ्या व काही शेळ्या घेऊन येथील मोरंडी शिवारामध्ये चारण्यासाठी घेऊन जात होते.
अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मेंढरांच्या कळपावर झडप घातली. थोरात यांच्या लक्षात येण्यापूर्वीच त्याने एका मेंढीला उसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला.
या दरम्यान मेंढपाळाचे दोन कुत्रे व थोरात यांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र तोपर्यंत त्याने मेंढीला ठार करून उसात पलायन केले होते.
या परिसरामध्ये बिबट्याचे अनेक दिवसांपासून वास्तव्य असल्याने पुर्वीदेखील या भागातील शेळ्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे. परंतू अद्याप पिंजरा लावला नाही