अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.
‘ असे म्हणत फटकारले होते. यावरून राजकीय वातावरण तापले. अनेकांनी अनेक अंदाजही बांधले. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार यांचे वक्तव्य आणि त्यावर शरद पवार यांनी दिलेली
प्रतिक्रिया हा विषय आमच्या कुटुंबातील आहे. यात अन्य कुणी पडण्याचे कारण नाही, असे त्यांनी फटकारले. आ. पवार शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यलयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी आले होते.
यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पार्थऐवजी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला.
राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी आजच माझ्या कानावर आली आहे.
त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचे कनेक्शन आहे, असे नमूद करत
आ. रोहित पवार यांनी या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. सुशांतला न्याय मिळायला हवा, असे आम्हालाही वाटते आहे. त्यामुळे यावर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved