अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- तुला मूल होत नाही ते होण्यासाठी तु माझ्या मित्राशी शरीरसंबंध ठेव असे सांगुन चक्क प तीनेच त्याच्यापत्नीला मित्रासाबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले नव्हे तर त्याने स्वत: पुढाकार घेत.
त्या मित्रास पत्नीवर अत्याचार करण्यासाठी पुढाकार घेवून हे अत्यंत वेदनादायी व तितकेच विकृत कृ त्य केले. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.
दुसऱ्या दिवशीही दोघांनी पुन्हा बलात्कार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येथे एक कुटुंब राहत असून त्या महिलेला मूल होत नसल्याने पतीनेच त्याच्या एका मित्राला रात्री दहा वाजता घरी आणले.
घराची आतुन कडी लावली. तुला मुल होण्यासाठी तु त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव असे सांगितले, तेव्हा पत्नीने विरोध केला. मात्र पतीने तिला दोन गोळ्या दिल्या नंतर तिला चक्कर आली त्यानंतर संबंधित मित्राने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर पतीनेही बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री दहा वाजता तो मित्र व पती दोघेही घरी आले व त्यांनी दोघांनी पुन्हा बलात्कार केला.
अशी फिर्याद अत्याचारीत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना संबंधित मित्र व महिलेचा पती यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.