अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमध्ये मामा-भाच्याचा खुनी थरार घडला. शेतीच्या वादातून झालेला हा भयानक प्रकार मामाच्या जीवावर बेतला. तर दुसऱ्या मामाच्या हल्ल्यात भाचा जखमी झाला.
भाच्याने मामाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घातला. यात कानिफनाथ गांगुर्डे (वय ६५) यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात मंगेश गांगर्डे याच्या फिर्यादीवरून मंगेश केदारी याच्या विरोधात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवगण येथे दारु व गांजाच्या नशेत मंगेश केदारी व कानिफनाथ संपत गांगर्डे या मामा भाच्यांमध्ये गुरुवार (दि.27) रोजी किरकोळ वाद झाला. त्यातून मारामाऱ्या झाल्या आणि त्यात भाच्याने मामाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घातला.
यात कानिफनाथ गांगुर्डे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कानिफनाथ याचा भाऊ रमेश संपत गांगर्डे याने घडलेली घटना वडगाव शेरी येथील कानिफनाथ याचा मुलगा मंगेश गांगर्डे याला फोनवरून सांगितली.
त्यानंतर श्रीगोंदे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved