अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- दारूच्या नशेत पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत तीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच परत दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मारहाण करीत पत्नीची हत्या केली.
मात्र या कृत्याचा नंतर पश्चाताप झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे घडली. याबाबत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून मयत वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लताबाई दशरथ दळे असे मृत महिलेच तर दशरथ मन्सीराम दळे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार रात्री ११च्या दरम्यान माझ्या आई वडिलांचे आपसात भांडण सुरु होते.
त्यांचे नेहमीच वाद होत असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर शुक्रवारी सकाळी ६ वाजता माझा लहान भाऊ संदीप याने वडील दशरथ यांनी घराजवळ असलेल्या एका झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे पाहिले.
त्यावेळी आम्ही दोघे भाऊ आईला उठविण्यासाठी घरी गेलो असता आईची हालचाल होत नव्हती.तिच्या डोक्याला मार लागून डोक्यातून व नाकातून रक्त येत होते. जवळच रक्त लागलेला लाकडी दांडा पडलेला होता.
वडिलांनी रात्रीच्या वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने मारहाण करून ठार मारले व त्यानंतर पश्चातापातच त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले. पोलिसांनी मृत दशरथ दळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .