अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरालगत राहणेमळा या ठिकाणी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संतोष श्रीरंग शेळके (रा. चैतन्यनगर ता. संगमनेर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.संतोष हा कुटुंबसमवेत चैतन्यनगर येथे राहत होता. दुपारच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला होता.
दरम्यान रात्रीच्या सुमारास राहणेमळा या ठिकाणी मारुती मंदिर येथे अज्ञात वाहनाने संतोषला जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी विश्वास रतन मुतडक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहेत.