‘त्याने’ सीआयडी अधिकारी असल्याचे भासवले आणि केले ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  श्रीगोंदा शहरात एका व्यक्तीस दोन भामट्यांनी सीआयडीत अधिकारी असल्याचे भासवत लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भीमराव कवडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्या भामट्यांनी त्यांच्याकडून सोन्याची चैन लांबविली. याबाबत सविस्तर हकीकत अशी: कवडे यांचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे.

शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी जात होते. यावेळी जुन्या स्टेट बँकेजवळ एका दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने कवडे यांना अडविले. शहरात गोंधळ झालाय.

मी सीआयडीत अधिकारी आहे, असे सांगून त्यांना बनावट ओळखपत्र दाखवून त्यांना त्यांच्याकडील वस्तू रुमालात बांधायला सांगितल्या. त्याचवेळी या व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्याला दमदाटी केली.

परतु ती व्यक्ती त्याचीच साथीदार होती. रुमालात घड्याळ व इतर वस्तू बांधत असतानाच या चोरट्याने कवडे यांच्या गळ्यातील चैन रुमालात ठेवली. ही चेैन घेऊन दोन्ही भामटे पसार झाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24