कोरोनाची खुंटलेली वाढ हळूहळू पुन्हा वाढतेय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यात सुरु असलेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागात कोरोनाच्या दररोजच्या आकडेमोडीचे प्रमाण कमी-अधिक होत कायम आहे.

बुधवारी (ता.6) रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सात जणांसह 24 जणांची नव्याने रुग्णसंख्येत भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याचा कोविड आलेख उंचावत आता सहा हजार 93 वर पोहोचला आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला तालुक्यातील रोजच्या रुग्णवाढीच्या गतीला मोठा ब्रेक लागल्याचे चित्र बुधवारपर्यंत दिसत होते. महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत सरासरी अकरा रुग्ण रोजच्या गतीने एकूण 55 रुग्णांची भर पडली होती.

बुधवारी मात्र त्यात मोठी वाढ होवून तब्बल 24 रुग्णांची भर पडली आहे. कोविडवरील लस उपलब्ध झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिक बेफिकीर होऊ लागले आहे,

यामुळेच नियंत्रणात येत असलेली स्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे जोपर्यंत प्रत्येकाचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोविडकडे गांभिर्याने बघण्याची नितांत गरज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24