Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. फसवणुकीचे प्रकार अत्यंत वाढलेले दिसतायेत. आता नगर-दौंड महामार्गावर एकाचे १५ लाख लुटून नेले आहेत.
पोलीस बनून आले व लाखोंना लुटले. दरम्यान १५ लाखांची रोकड घेऊन त्यातून ५५ लाख रुपयांच्या नकली नोटा घेण्यासाठी हे पैसे चालवले होते अशीही धक्कादायक चर्चा नागरिक करत आहेत.
अधिक माहिती अशी : श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या नगर-दौंड महामार्गावर टोल नाक्याजवळ एका चारचाकी गाडीमध्ये १५ लाखांची रक्कम घेऊन ती बदलण्यासाठी जात असताना अचानक खाकी वर्दीतील पोलीस आले.
त्यांनी ते वाहन अडवले व १५ लाख रुपये आणि एक व्यक्ती घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेले. परंतु बराच काळ गेला पण ते आलेच नाहीत व त्यांचा तपासही लागेना. त्यामुळे संबंधितांची फसवणूक झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.
सोलापूर जिल्ह्यातून नगरच्या दिशेने दौंडवरून नगरकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीमध्ये १५ लाखांची रोकड घेऊन त्यातून ५५ लाख रुपयांच्या नकली नोटा घेण्यासाठी चाललेल्या नागरिकांना नगर-दौंड महामार्गावर रविवारी (दि. २८) रात्री साडेदहा वाजता काष्टी सांगवी फाट्याजवळील टोल नाक्यानजीक वर्दीमधील दोन पोलिसांनी त्यांना अडवले.
त्यांना दमदाटी करत त्यांच्याकडील रोख १५ लाख रुपयांची रक्कम व त्यांचा एक व्यक्ती घेऊन पोलिस स्टेशनला या असे सांगितले. १५ लाख रुपये घेऊन त्यांचा एक व्यक्ती पोलिसासोबत घेऊन गेले.
मात्र, या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यासह इतर ठिकाणी संबंधित व्यक्तीचा नातेवाइकांनी शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. त्यामुळे संबंधित ठिकाणी अडवून अशा प्रकारचे काही स्कॅम झालेत का? याबाबत नातेवाइकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
आलेल्या पोलिसांपैकी सावंत नावाचा एक पोलिस असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र, याबाबत सखोल चौकशी केली असता सावंत नावाचा कोणताही पोलिस श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत नाही.
त्यामुळे तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.