अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे व आमदार मोनिका राजळे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला.
या निवडणुकीसाठी १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ३० अर्ज ठरले. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५५ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने १९ जागांसाठी १९ अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी शनिवारी जाहीर केले.
९ जानेवारीला कारखान्याचे अध्यक्ष राजळे यांनी सभासद शेतकऱ्यांचा पाथर्डीत मेळावा घेतला होता. सर्वाधिकार राजळे यांना देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला होता. राजळे यांनी भौगलिक समतोल राखत, नव्या-जुन्याचा मेळ घालत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
नवीन चेहऱ्यांमध्ये साकेगावचे साहेबराव सातपुते, मिरी – डॉ. यशवंत गवळी, हनुमान टाकळी – कुशिनाथ बर्डे, जवळवाडी – बाळासाहेब गोल्हार, पाथर्डी – काकासाहेब शिंदे, चुंभळी – शेषराव ढाकणेंसह स्वत: आमदार मोनिका राजळे व राहुल राजळे हे संचालक मंडळात जात आहेत.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे – कासार पिंपळगाव – अप्पासाहेब राजळे, उध्दवराव वाघ, चितळी – अनिल फलके, सुभाष ताठे, साहेबराव सातपुते, कोरडगाव – श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, पाथर्डी – रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, मिरी – शरद अकोलकर, डॉ. यशवंत गवळी, टाकळी मानूर – बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे.
सहकारी संस्था प्रतिनिधी – राहुल राजळे, अनु. जाती जमाती – काकासाहेब शिंदे, महिला प्रतिनिधी – आमदार राजळे, सिंधु जायभाये, इतर मागास प्रवर्ग – कुशिनाथ बर्डे, भटक्या विमुक्त जाती, जमाती – कोंडीराम नरोटे.