अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातून तो एकजण हद्दपार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

भिंगार कॅम्प पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीतुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत पाठविण्यात आले होते.

यात विजय आसाराम रासकर रा.चौधरी नगर, सारसनगर अहमदनगर यास हद्दपार करण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन त्यास जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, पोसई बोरसे, सफौ. कैलास सोनार, पोहेकॉ. दीपक शिंदे, पोहेकॉ. संदीप घोडके, पोकों. कैलास शिरसाठ, पोकों. देवा थोरात,पोकों. अमोल आव्हाड यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office