महानगरपालिकेतील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ द्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करुन, महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका महानगरपालिका पेन्शन असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगर विकास राज्यमंत्र्यांना ई मेलद्वारे पाठविणात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांनी दिली. कोरोना महामारीचा प्रसार मार्च 2020 पासून सुरु झाला. त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे.

हे संक्रमण रोखण्यासाठी महानगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात या संकटाला स्वतःचा जीव धोक्यात घालून सशक्त लढा देत आहेत. परंतु त्याची दखल शासन स्तरावर घेतलेली दिसून येत नाही. आजही महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर कोरोनाचा प्रतिकार रोखण्यासाठी

सदर यंत्रणेचा वापर करताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचा विमा उतरवून त्यांच्या कुटुंबीयांना एक प्रकारे संरक्षण देण्यात आले आहे. परंतु महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद येथील कर्मचार्‍यांचा कोणत्याही प्रकारचा संरक्षण विमा उतरविण्यात आलेला नाही.

त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कोणतेही संरक्षण व लाभ देण्यात आलेले नाही. तसेच शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचार्‍यांना शासनाचा सातवा वेतन आयोग लागू करून त्यांना पहिला हप्ताही देण्यात आलेला आहे. परंतु महानगरपालिका,

नगरपालिका, नगरपरिषदच्या कर्मचार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू करताना खूप जाचक अटी व शर्ती लागू करून नंतर त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असा आदेश दिलेला आहे. परंतु अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मंत्रिमंडळाने महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करून दिवाळी भेट द्यावी, सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करताना घातलेल्या जाचक अटी शिथिल कराव्या, कोरोनाशी लढा देत असलेले महानगरपालिका,

नगरपालिका व नगरपरिषदच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सी.एल. पाखले, एल.के. जगताप, डि.यू. देशमुख, के.सी. वर्मा, आर.के. गावडे, आर.जी. शेख, पठाण, डि.के. पाठक, डी.एल. खांडेकर, रामदास वखारे, वसंत गायकवाड, मोरे, सुशिला शेट्टी, शांता शेकटकर, सुशिल शेलार, कदम, वत्सल पाचारणे आदि प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24