अहमदनगर बातम्या

सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला सुनावणी ; निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार !

Published by
Mahesh Waghmare

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या राज्यात महत्वाचा विषय असलेला संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट हाती आली असून, यामुळे मात्र अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची मंगळवारची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे आता २५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. तपरिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग फेररचना आणि सदस्यांची संख्या वाढवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभाग व सदस्य संख्या पूर्ववत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांवरूनही या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असून, याबाबत राजकीय पक्षांमध्ये मतभेद नसल्याने इतर मुद्दे निकाली काढावेत, अशी विनंती मंगळवारी न्यायालयाला करण्यात आली. सरकारी वकील तुषार मेहता यांनी राज्य सरकार लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

याचिकाकर्त्यांनी निवडणुकांबाबत सकारात्मक भूमिका मांडली.यावर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारी ही नवी तारीख दिली. पुढील सुनावणीत हे प्रकरण प्राधान्यक्रमाने ऐकण्यात येईल, असेही कोर्टाने सांगितले. पुढील सुनावणीत हा खटला निकाली निघाला तर एप्रिल-मेमध्ये निवडणुका होऊ शकतात.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare