अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या मुलाने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास याने आपल्या घरात आत्महत्या केली.
त्यानंतर दुःखात बुडालेल्या त्याच्या वडिलांनी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे. संजय फडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे.
मात्र, सध्या कोरोनाने व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असावा. त्यांचा मुलगा राहुल हा एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट या पदावर कार्यरत होता.
मुलाची आत्महत्येची घटना घडल्यावर त्यास नागरिकांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असताना वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले.
शवविच्छेदनासाठी नातेवाईक तेथे थांबले असता मृत तरुणाच्या पित्याने आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर कोणी नाही, ही संधी साधत मृताच्या पित्याने आत्महत्या केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews