अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : शिक्षकाची नोकरी देतो, शासनाची ऑर्डर देतो, असे सांगून एकाची १० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. दीपक बापूसाहेब पवार (रा.वाकडी, ता.पाथर्डी) यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
सुभाष बन्सी साळवे, अनिता सुभाष साळवे, अनिल तुळशीराम शिंदे, मंगल अनिल शिंदे, राजू बन्सी साळवे, संजय बन्सी साळवे व रेखा संजय साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, दीपक पवार यांना संबंधित इसमांनी संगनमत करून सहशिक्षक म्हणून नियुक्ती करून देतो, असे सांगत मुलाखत घेतली.
तात्पुरत्या स्वरुपाची ऑर्डरही दिली. पगार वेळेवर मिळण्याची हमी दिली. मात्र त्यासाठी ७ लाख रुपये रोख व पगार रक्कम ३ लाख ७२ हजार रुपये असे एकूण १० लाख ७२ हजार रुपये घेतले.
तद्नंतर कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता फसवणूक करण्यात आली. बापू पवार यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.