पाणलोटात दमदार पाऊस; मुळा 80 टक्के भरले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  गेल्या आठवड्यापासून पावसाने मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. पाणलोटात कालपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अलीकडच्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये भरण्याची शक्यता आहे.

यामुळे धरणातून 8373 क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सायंकाळी 20500 दलघफू (78.85 टक्के) साठा झाला होता. पहाटेपर्यंत या धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे सरकलेला असेल. दोन दिवसांपूर्वी पावसाने मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई या भागात काहीशी विश्रांती घेतली होती.

पण अधूनमधून बरसणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच होती. मुळा धरणात गत 24 तासांत 321 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. आवक लक्षात घेता आज या धरणातील पाणीसाठा 20000 दलघफूपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 341 दलघफू पाणी आले. ते पाणी निळवंडेत सोडण्यात आले.

भंडारदरात सध्या 10694 दलघफू (96.87टक्के)पाणीसाठा आहे. याधरणातून 6640 क्युसेकने पाणी निळवंडे धरणात येत आहे. तर निळवंडेतून 7861 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ओझर ओव्हरफ्लो 8717 क्युसेकने सुरू आहे.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24