मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह वीट उत्पादकांचे मोठे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. तब्बल दोन तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ तास वीज परवठा विस्कळीत झाला.

संगमनेर शहर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात प्रारंभ झाला. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन तास हा पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांदा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी नुकताच काढलेला गहू बाहेर ठेवला होता. हा गहू मोठ्या प्रमाणावर भिजला.

या पावसामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. रात्री दोन वाजता गायब झालेली वीज सायंकाळी पाच वाजता आली. रात्री अचानक आलेल्या पावसाने तालुक्यातील वीट भट्टी चालकांचे मोठ्या प्रामानात नुकसान झाले. वीट भट्ठयांवरील लाखो रुपयांच्या विटांचे या पावसामुळे नुकसान झाले.

महसूल विभागाने वीटभट्ठयांचे पंचनामे करून शासनास अहवाल पाठवावा, अशा आशयाचे निवेदन वीट भट्टी मालकांनी प्रांताधिका- यांना दिले आहे. कुंभार समाज व इतर वीट भट्टी धारकांना अवकाळी पावसामुळे जे नुकसान होते.

त्या करिता शासन दरबारी विटा भट्टी मालकांची मागणी मंजूर करण्यास व वीट भट्टी व्यवसायास विमा योजना लागू करवाण्यास सरकार दरबारी प्रयत्न व्हावे, शेतीसाठी विमा योजना लागू केली त्याच धर्तीवर वीट भट्टी व्यवसायाला विमा योजना लागू करावा, अशी मागणी कैलास वाकचौरे, राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, रमेश भालेराव यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe